Last Updated: Monday, May 27, 2013, 10:28
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरकोल्हापुरात शनिवारी पोलिसांनी टोल विरोधी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर केलेल्या लाठिमाराच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात बंद पुकारण्यात आलाय.
टोल विरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर केल्याचा आरोप करत टोलविरोधी कृती समितीनं जिल्हाप्रशासनाच्या निषेधार्थ हा बंद पुकारलाय. बंदच्या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू रहातील असं संघटनेच्या वतीनं जाहीर करण्यात आलंय.
कोल्हापुरात टोल विरोधी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर केला होता. यावेळी पोलीस आणि आंदोलनका एकमेकाना भिडले आणि आंदोलनानं हिंसक वळण घेतलं होत.. पोलिसांच्या कृतीचा निषेध म्हणून आजचा बंद पुकारण्यात आलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 27, 2013, 10:28