Last Updated: Saturday, March 15, 2014, 16:45

www.zee24taas.com, झी मिडिया, कोल्हापुर
कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीयं. रेल्वे पार्सल विभागात सोमवारी अर्धनग्न अवस्थेत असलेल्या तरुणीला मोटारीमधून फेकल्याचे आज उघडीस आलंय.
ती मोटार थांबविण्यासाठी तेथील कर्मचारांनी प्रयत्न केले, मात्र मोटार वेगात गेली. त्या तरुणींला गुंगीचे औषध दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे ती तरुणी काही तास बेशुद्ध होती.
अंदाजे २८ वर्ष वय असलेले तरुण रात्री साडेआठच्या सुमारास पार्सल विभागाकडे आले आणि त्यांनी या तरुणीला बाहेर फेकले. सदर घटना पाहिलेल्या तेथील लोकांनी आरडाओरड केली मात्र त्यांचा काहीच उपयोग झाला नाही.
ते तरुण भरधाव वेगाने मोटार घेऊन गेले. ती तरुणी अर्धनग्न अवस्थेत होती. पीडित तरुणीची ती अवस्था पाहून तेथे उपस्थित असलेल्या काही वेश्यानी तिच्या अंगावर कपडे चढवले. तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेतचं होती.
रेल्वे पोलिसांनी त्या तरुणीला ताब्यात घेतले असून ती तरुणी सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता शुद्धीवर आली. पीडित तरुणीला गुंगीचे औषध दिले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, March 15, 2014, 16:45