Last Updated: Thursday, June 27, 2013, 23:55
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरकोल्हापुरातल्या सीरियल किलिंग प्रकरणात अटकेत असलेल्या दिलीप लहरियानं आणखी एक खून केल्याची कबुली पोलिसांना दिलीय.
यापूर्वी दिलीपनं आपण दोन जणांचे खून केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर आता त्यानं लक्ष्मीपुरीतल्या रिलायन्स मॉलजवळ झोपलेल्या वृध्द महिलेच्या डोक्यात सळीनं वार करून खून केल्याचं कबुल केलंय.
एवढंच नव्हे तर अन्य ठिकाणी झालेल्या खुनाच्या ठिकाणी दिलीप लहरियाचं अस्तित्व असल्याचे पुरावेही पोलिसांना मिळालेत. दिलीप लहरियाची मानसिक स्थिती बिघडलेली असल्यामुळं त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
उपचारानंतर पोलीस त्यांची पुन्हा कसून चौकशी करणारेत. त्यामध्ये कोल्हापूर प्रमाणं मिरज इथल्या खुनाचेही धागेदोरे सापडतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तवलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 27, 2013, 23:55