Last Updated: Saturday, July 27, 2013, 07:47
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरकोल्हापुरातल्या सिरीअल किलरनं पुण्यातही खून केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. कोल्हापूरमध्ये दहा भिकाऱ्यांचा दगडाने खेचून खून केल्याप्रकरणी दिलीपसिंह लहारिया याला अटक करण्यात आलीय.
हा आरोपी २०१० ते २०१२ ही दोन वर्षं पुण्यात राहत होता. त्यानं कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीनं खून केले, त्याच पद्धतीनं पुण्यामध्ये ४ ते ५ खून झाले होते. स्वारगेट, कोथरूड तसंच वारजे परिसरात हे भिका-यांचे खून झाले होते. त्यांचा उलगडा अजूनपर्यंत झालेला नाहीये.
दिलीपसिंह मुळचा छत्तीसगडमधला आहे. त्याची पत्नी दुस-या एका भिका-याबरोबर पळून गेल्याचा राग त्याच्या मनात आहे. त्यासाठीच त्यानं हे हत्यासत्र घडवल्याचा अंदाज आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, July 26, 2013, 20:14