कोल्हापूरात हस्तीदंत जप्त

कोल्हापूरात हस्तीदंत जप्त

कोल्हापूरात हस्तीदंत जप्त
www.24taas.com, कोल्हापूर

कोल्हापूरात २० त २५ लाखांचं हस्तीदंत जप्त करण्यात आले आहेत. या हस्तीदंताची अवैधपणे विक्री होणार होती.

रोहित मेहता, सिद्धार्थ काळे या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलीये. शहरातील सायबर चौक इथं हा हस्तीदंत विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपींकडे ९ हस्तीदंतासह हत्तीच्या जबड्याचा भाग सापडला.

हस्तीदंत तस्करांची टोळा कार्यरत असल्याचे या नित्ताने उघड झाले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीतआहेत. दरम्यान, हे हस्तीदंड कोठून आणले गेलेत याची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच वन्य प्राण्यांची शिकार होत असल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे.

First Published: Saturday, December 8, 2012, 10:08


comments powered by Disqus