चुकीच्या पद्धतीनं सिझरीन; महिलेचा गेला जीव, lady lost life because of doctors in pimpri

चुकीच्या पद्धतीनं सिझरीन; महिलेचा गेला जीव

चुकीच्या पद्धतीनं सिझरीन; महिलेचा गेला जीव
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड

डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेला नाहक जीव गमवावा लागलाय. चुकीच्या पद्धतीनं सिझरिन केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. आणखी धक्कादायक बाब म्हणजे एक दिवसाच्या बाळाला तसंच सोडून डॉक्टर पसार झालाय.

चिंचवडच्या खैरे रुग्णालयात सुमाया इम्रान शेख या महिलेला प्रसूतीसाठी २९ जुलैला दाखल करण्यात आलं. सुरुवातीला नॉर्मल डिलिव्हरी होईल, असं सांगण्यात आलं. पण त्याच रात्री अचानक तिचं सिझरिन करावं लागेल, असं खैरे रुग्णालयाचे प्रमुख शिवाजी खैरे यांनी सांगितलं. त्यानुसार सुमाय्याचं सिझरिन करण्यात आलं. पण ३० तारखेला अचानक सुमाय्याचे टाके तुटले. त्यानंतर पुन्हा टाके घालण्यात आले. पण या सर्व प्रकारात प्रचंड रक्तस्त्राव झाला. इतकं होऊनही डॉक्टर शिवाजी खैरे यांनी वेळीच तिला ICU मध्ये हलवलं नाही. तिच्या मृत्यूला डॉक्टर खैरे जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरांनी सुमाय्यावर चुकीचे उपचार तर केलेच, पण सिझरिननंतर जन्मलेल्या एक दिवसाच्या बाळाला तसंच सोडून डॉक्टर पसार झाले. डॉक्टर खैरे या घटनेनंतर गायब झालेत. त्यांचा फोन बंद आहे. तर रुग्णालयात काही कामगार वगळता कोणीही हजर नाही. त्यामुळे येत्या काळात हे प्रकरण आणखी चिघळणार, अशी शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 1, 2013, 17:19


comments powered by Disqus