लता मंगेशकरांचाच जय(प्रभा)! Lata Mangeshkar`s Jaiprabha studio

लता मंगेशकरांचाच जय(प्रभा)!

लता मंगेशकरांचाच जय(प्रभा)!
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

सध्या लता मंगेशकर यांच्या मालकीच्या असलेल्या कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडीओ संदर्भातील याचिका कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने ही जागा बांधाकामाकरीता वापरता येऊ नये यासाठी याचिका दाखल केली होती. मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास असणाऱ्य़ा जयप्रभा स्टुडिओचं जतन व्हावं यासाठी याचिका दाखल कऱण्यात आली होती. मात्र मालकी लता मंगेशकर यांची असल्याने त्या ठिकाणी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, असं सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

दरम्यान, या निकालाचा अभ्यास करून स्टुडिओ वाचवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचं मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सांगितलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, July 11, 2013, 19:51


comments powered by Disqus