माजी आमदार लक्ष्मण मानेंवर बलात्काराचा गुन्हा, Laxman Mane is accused of rape

माजी आमदार लक्ष्मण मानेंवर बलात्काराचा गुन्हा

माजी आमदार लक्ष्मण मानेंवर बलात्काराचा गुन्हा
www.24taas.com,सातारा

`उपरा` या गाजलेल्या कादंबरीचे लेखक आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायमस्वरूपी स्वयंपाकीण म्हणून घेतो असे सांगून वारंवार बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पीडित तीन महिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटेलय, २००३ पासून जकातवाडी येथेली भारतीय भटके व विमुक्त विकास व संशोधन संस्था संचलित शारदाबाई पवार आश्रमशाळेत आम्ही स्वयंपाकीण आहोत. या आश्रमशाळेत आम्ही तात्पुरत्या पदावर रूजू झालो. त्यानंतर संस्थेचे कार्याध्यक्ष माने यांनी स्वयंपाकीण म्हणून कायमस्वरूपी कामावर घेण्याचे आमिष दाखवून आमच्यावर वारंवार बलात्कार केला.

साहित्यिक असलेले लक्ष्मण माने यांना 'पद्मश्री' या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. तसेच ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आहे. आश्रमशाळा या संस्थेच अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यामुळे आता पवार काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

दोन महिलांना पोलिसांनी साक्षीदार बनविले आहे. तर एका महिलेची तक्रार दाखल करून घेतली आहे. या महिलांसा पोलिसांना माहिती देताना सांगितले की, माने यांनी वारंवार बलात्कार केला आहे. पुणे येथील एका लॉजवर बलात्कार करण्यात आला. या महिलांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे वैद्यकीय रिर्पोट काय येतो, याकडे लक्ष लागले आहे.

First Published: Tuesday, March 26, 2013, 12:21


comments powered by Disqus