वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अखेर `त्या` बिबट्याचा मृत्यू leopard dies

वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अखेर `त्या` बिबट्याचा मृत्यू

वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अखेर `त्या` बिबट्याचा मृत्यू
www.24taas.com, अहमदनगर

अहमदनगरच्या भोकर गावात धुमाकूळ घालणा-या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घालणारा हा बिबट्या पारधी समाजाच्या मुलांनी लावलेल्या जाळ्यात खरंतर अडकला होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी वन कर्मचा-यांना बोलावण्यात आलं. मात्र त्यांनाही या बिबट्याला पकडण्यात अपयश आलं आणि बिबट्या या जाळीतून निसटून जाण्यात यशस्वी ठरला.

बराच काळ फासात अडकलेला बिबटयाची सुटका झाल्यानंतर या बिबटयाला पकडण्या साठी आलेल्या वन कर्मचा-यांवरच या बिबटयाने हल्ला केला. यांत चार वन कर्मचारी जखमी झाले. आजही जखमी अवस्थेतील हा बिबटया अकोश नगर साखर कारखान्याच्या शेतात बसला होता. मात्र आज वनविभागाने या बिबटयाला पकडण्याचा कोणताही प्रयत्न केला नसल्याचं समोर आलंय. एवढंच नाही तर कोणताही वन कर्मचारी या बिबटयाकडे फिरकलाही नसल्याचं दिसून आलंय.


कालच फासात अडकलेल्या बिबटयाला गुंगीच औषध देवुन पकडता आले असते. मात्र त्याला पकडण्यात आलं नाही. मात्र आता या बिबट्याचा मृत्यू झालाय... वनाधिका-यांच्या दुर्लक्षामुळं या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय...

First Published: Sunday, March 10, 2013, 20:43


comments powered by Disqus