पुण्यात पुन्हा मद्यधुंद पार्टी liquor party in Pune

पुण्यात पुन्हा मद्यधुंद पार्टीचा पर्दाफाश

पुण्यात पुन्हा मद्यधुंद पार्टीचा पर्दाफाश

www.24taas.com, पुणे

पुण्याला पार्टी कल्चर नवीन राहिलेलं नाही. गेल्याच आठवड्यात पुण्यात अल्पवयीन मुलांच्या चिल्लर पार्टीचा पर्दाफाश झाला होता. शनिवारी ‘रिव्हर व्ह्यू रिसॉर्ट’वर कारवाई झाली होती. तरीही त्यानंतर गेल्या रविवारी पुन्हा पार्टी रंगली होती. त्यानंतर रात्री पुन्हा वाघोलीतल्या माया क्लबमध्ये पुन्हा पार्टी रंगली. ही पार्टी विनापरवाना होती.

माया हॉटेल पोलीस अधिका-याच्या पत्नीच्या मालकीचं असल्याचं स्पष्ट झालंय. पुण्यातल्या वाघोली परिसरातील हायप्रोफाईल दारु पार्टीचा पर्दाफाश करण्यात आलाय. पोलिसांनी धिंगाणा घालणाऱ्या तीनशे जणांना ताब्यात घेतलंय.

वाघोली परिसरातल्या माया क्लबमध्ये ही पार्टी सुरु होती. ताब्यात घेतलेल्या तरुण तरुणींना वैद्यकीय चाचणीसाठी रवाना करण्यात आलंय. त्यांनी ड्रग्स घेतलं असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

First Published: Sunday, September 2, 2012, 10:08


comments powered by Disqus