बिअर पार्टी उद्धवस्त, १२ मुली ताब्यात, loanawala rade in banglow

बिअर पार्टी उद्धवस्त, १२ मुली ताब्यात

बिअर पार्टी उद्धवस्त, १२ मुली ताब्यात

www.24taas.com, झी मीडिया, लोणावळा
लोणावळ्यातल्या एका बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला. पवना डॅमच्या बॅक वॉटर परिसरात बंगल्यात एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. छाप्यादरम्यान 12 मुलींसह 35 जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

कारण पार्टीच्या नावाखाली इथे धिंगाणा सुरू होता. या बंगल्यात दारु पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. अटक करण्यात आलेले सर्वजण मुंबईत घाटकोपर परिसरातल्या बांधकाम व्यवसायाशी संबंधीत आहेत.

बंगल्यातून ताब्यात घेतलेल्या १२ तरुणी राजस्थान आणि पश्चिम बंगालमधल्या असल्याचं तपासात उघड झालं. बंगला मुंबईतल्या चोप्रा नावाच्या व्यक्तीचा आहे. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारुही जप्त केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 31, 2013, 21:34


comments powered by Disqus