Last Updated: Wednesday, April 17, 2013, 13:42
www.24taas.com, पुणे पुण्यात २००८ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत ३३ कोटींचा घोटाळा झाल्याचं स्पष्ट झालंय. याप्रकरणी सुरेश कलमाडींच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
विधानसभेत आज लोकलेखा समितीचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात २००८ मध्ये पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तब्बल ३३ कोटींचा घोटाळा झाल्याचं नमूद करण्यात आलंय. सोबतच या अहवालात संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याची शिफारसदेखील करण्यात आलीय.
बालेवाडी संकुलात २००८ साली युवा राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बालेवाडीत उभारण्यात आलेल्या हॉटेलच्या बांधकामात घोटाळा झाल्याचं स्पष्ट झालंय. कलमाडींकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करावी, अशी शिफारसही समितीनं आपल्या अहवालात केलीय.
First Published: Wednesday, April 17, 2013, 13:34