Last Updated: Friday, January 3, 2014, 23:23
माळशेज घाटात काल झालेल्या ट्रक आणि एसटी बसच्या अपघातग्रस्त कुटुंबीयांची आज उपमुख्यमंत्री अजित पवार आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी भेट घेतली.
www.zee24taas.comमाळशेज घाटात काल झालेल्या ट्रक आणि एसटी बसच्या अपघातग्रस्त कुटुंबीयांची आज उपमुख्यमंत्री अजित पवार आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी भेट घेतली.
जुन्नर तालुक्यातल्या आहेर आणि दाते कुटुंबीयांमधल्या प्रत्येकी एका अशा दोघांना एसटी महामंडळात नोकरी दिली जाईल, असं यावेळी त्यांनी जाहीर केलं.
काल माळशेज घाटात झालेल्या भीषण अपघातात 28 प्रवाशांचा बळी गेला होता. त्यामध्ये आणे इथल्या आहेर कुटुंबातले 7 जण मृत पावलेत. तर दुपारी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनीही भेट देऊन आहेर कुटुंबीयांना एक लाख आणि दाते कुटुंबीयांना २१ हजारांची मदत केली.
दरम्यान आणे यात्रेवर दु:खाचं सावट दिसून आज दुकानदारांनी आपली दुकानं बंद करून दुखवटा पाळला. या अपघातात जुन्नर परिसरातल्या सर्वात जास्त प्रवाशांचा मृत्यू झाल्यानं तालुक्यावर शोककळा पसरलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, January 3, 2014, 23:10