Last Updated: Wednesday, January 30, 2013, 18:29
www.24taas.com, कोल्हापूरबंदी असतानाही कोल्हापुरात मटका सुरू असल्याचं धक्कादायक चित्र पहायला मिळतंय. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या जिल्ह्यातच मटका तेजीत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
मटका खुलेआम सुरु असताना मात्र कोल्हापूर पोलीस दल बघ्याची भूमिका घेतंय. या पाठीमागचं गौडबंगाल काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. तर सोलापुरात संतप्त झालेल्या महिलांनी संभाजी ब्रिगेडच्या मदतीनं दारु अड्डे उध्वस्त केलेत.
दारु बंदी खात्याला आणि पोलिसांना वारंवार कळवूनही काहीही भूमिका त्याविरोधात न घेतल्यामुळे महिलांनी दारु अड्डे उध्वस्त केले.
First Published: Wednesday, January 30, 2013, 18:29