‘पक्षातल्याच लोकांनी गळा कापला’; मिलिंद पाटणकर ‘झी २४ तास’वर..., milind patnkar on zee 24 taas

‘पक्षातल्याच लोकांनी गळा कापला’; मिलिंद पाटणकर ‘झी २४ तास’वर...

‘पक्षातल्याच लोकांनी गळा कापला’; मिलिंद पाटणकर ‘झी २४ तास’वर...
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

गेले दोन दिवस गायब असलेले ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर आज सर्वप्रथम `झी २४ तास`वर अवतरले. आपल्याला कुठलीही मारहाण झाली नसून चार दिवस विश्रांतीसाठी म्हणून आपण बाहेर फिरायला गेल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.

‘माझ्यावर पैसे घेतल्याचा आरोप धादांत खोटा आहे... माझ्या संपूर्ण आयुष्यात मी भाजप सोडणार नाही’ असं यावेळी सांगत सगळं काही आलबेल असल्याचं पाटणकर यांनी म्हटलंय. सोबतच, ‘पक्षातल्याच लोकांनी माझा गळा कापला... काही लोकांनी परिस्थितीचा गैरफायदा घेत माझ्याशी दगाफटका केला’ असंही मिलिंद पाटणकर यांनी यावेळी म्हटलंय. केवळ गोंधळ वाढू नये, यासाठी आपण राजीनामा दिला... पण, या लोकांविरुद्ध पक्षश्रेष्ठींकडे आपण दाद मागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

आपण आपल्या कुटुंबीयांशी सतत संपर्कात होतो आणि सध्या आपण कर्नाटकात असल्याचंही मिलिंद पाटणकर यांनी म्हटलंय.


काय म्हणालेत नेमके मिलिंद पाटणकर... ऐका त्यांच्याच तोंडून





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 25, 2013, 18:27


comments powered by Disqus