मिनी बसने अचानक घेतला पेट Mini bus burns automatically

मिनी बसने अचानक घेतला पेट

मिनी बसने अचानक घेतला पेट
www.24taas.com, शिर्डी

शिर्डी जवळच्या राहाता इथं आज अचानक एका मिनी बसनं पेट घेतल्यानं मोठा गोंधळ उडाला होता. या बसमध्ये एकही प्रवासी नसल्यानं जीवितहानी टळली.

राहाता शहराच्या जवळच असलेल्या साकुरी शिवारात शिर्डीतल्या एका बस चालकानं आपली मिनी बस कामासाठी आणली होती. काम झाल्यानंतर उतारावर आपली बस लावून तो एका दुकानात काही वस्तू आणण्यासाठी गेला असता अचानक या बसनं पेट घेतला. बस पेटलेल्या अवस्थेतच काही अंतर पुढे गेली. बसमधून मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीचे लोट बाहेर निघू लागल्यानं कुणाचीही पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. काही वेळानंतर आसपासच्या काही तरुणांनी या बसच्या काचा फोडल्या आणि त्यावर पाण्याचा मारा करुन बस विझवण्यात आली.


सुदैवानं या बसमध्ये एकही प्रवासी नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. तसंच रस्त्यावरच एका दगडाला ही बस अडकल्यामुळे ती आसपासच्या दुकानात शिरली नसल्यामुळेही मोठा अनर्थ टळलाय.

First Published: Tuesday, April 16, 2013, 20:58


comments powered by Disqus