Last Updated: Sunday, May 12, 2013, 21:16
www.24taas.com, झी मीडिया, इंदापूरकलाकारांनी एखाद्या सिनेमात राजकारण्याची भूमिका साकारणं जसं नवीन नाही मात्र, एखाद्या मंत्र्याने सिनेमात काम करणंही आता नवीन राहिलेलं नाही. याआधीही जितेंद्र आव्हाड, बबनराव पाचपुते, बबनराव घोलप, छगन भुजबळ, रामदास आठवले रुपेरी पडद्यावर झळकलेत. या यादीत आता भर पडलीये सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची.
संसदीय कामकाज मंत्री आणि सहकार मंत्री पदाची धुरा सांभाळणारे हर्षवर्धन पाटील यांना आपण ब-याचवेळा टेलिव्हीजनवर पाहिलंय.. मात्र, हे दृश्य सिनेमातलं आहे सांगितलं तर.. खरं वाटत नसलं तरी हे खरं आहे.. इंदापूरच्या शिव कुमार गुणवरे निर्मित `कसं काय मामा बरं आहे का?` या सिनेमातून हर्षवर्धन पाटील रुपेरी पडद्यावर झळकलेत.
महत्वाचं म्हणजे शेती कशी चांगली आहे हे पटवून देण्याची संधी त्यांनी इथेही सोडली नाही. इंदापूरमध्ये तर प्रेक्षकांनी या सिनेमाला पसंतीची पावती दिलीय.. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रातले प्रेक्षक हर्षवर्धन पाटील यांची ही नवी भूमिका स्विकारतात का याचीच उत्सुकता आहे..
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, May 12, 2013, 21:16