Last Updated: Wednesday, December 26, 2012, 14:41
www.24taas.com, सोलापूर दिल्लीतली सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच सोलापूरात एका १३ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. धक्कादायक प्रकार म्हणजे, हा बलात्कार करणारी दोन्ही मुलंही अल्पवयीन आहेत.
उत्तर सोलापूरमधील कोंडी इथं ही घटना घडलीय. पीडीत मुलीचे आईवडील वीटभट्टी कामगार आहेत. ती आईवडीलांबरोबर सोलापुरातल्या कुंभारगल्लीत वास्तव्याला होती. मुलीचे आईवडील घरी नसताना त्याच परिसरातल्या दोन अल्पवयीन मुलांनी मुलीवर बलात्कार केलाय.
पीडित मुलीच्या आईवडिलांच्या तक्रारीवरुन सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. १३ वर्षीय मुलीची वैद्यकीय तपासणी केलीय. बलात्कार करणारी दोन्ही मुलं फरार झाली आहेत. तालुका पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या तपासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची पथकं पाठवण्यात आली आहेत.
First Published: Wednesday, December 26, 2012, 14:41