Last Updated: Tuesday, February 26, 2013, 17:47
www.24taas.com, सांगलीसांगलीत मनसे कार्यकर्त्यांनी मराठी उमेदवाराला परप्रांतीय समजून मारहाण केली आहे. वैद्यकीय अधिकारीपदाच्या मुलाखती दरम्यान हा प्रकार घडला आहे.
सांगलीच्या शासकीय रूग्णालयातील कंत्राटी वैद्यकिय अधिकाऱ्यांची मुलाखत प्रकिया सुरू होती. २० जागांसाठी १०० विद्यार्थी मुलाखतीसाठी आलेले होते. त्यातील ८० टक्के विद्यार्थी हे परप्रांतिय समजून मनसेच्या कार्यकर्त्यांनी तेथे धुडगूस घातला, कर्नाटकमधील विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळतात तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळतात. आणि त्यामुळेच तेथे जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी हंगामा घातला. आणि मुलाखत प्रकिया बंद पाडली.
या आंदोलन सुरू असताना एका मराठी मुलालाच मनसैनिकांनी मारहाण केली. मात्र हा मुलगा मराठीच असल्याचे समजते. सांगली मधील तासगावचा हा विद्यार्थी आहे, तो फक्त शिक्षणासाठी कर्नाटकात होता. मात्र मनसैनिकांनी मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन केले आणि मराठी मुलालाच मारहाण केली.
First Published: Tuesday, February 26, 2013, 17:31