माण, खटावच्या चारा छावण्यांवरुन मनसे आक्रमक, MNS karyakarta Angry In Satara Breaks the car

माण, खटावच्या चारा छावण्यांवरुन मनसे आक्रमक

माण, खटावच्या चारा छावण्यांवरुन मनसे आक्रमक
www.24taas.com , झी मीडिया, सातारा

साताऱ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एस. पऱ्हाड यांच्या चारचाकी वाहनाची मनसेच्या चार कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. तोडफोडीच्या निषेधार्थ महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आता जिल्हाभर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलंय.

दुष्काळी माण, खटाव, फलटण तालुक्या त चारा छावण्या सुरू ठेवण्यात याव्यात. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 5 ऑगस्टपासून उपोषण सुरू आहे. आज सकाळी बाराच्या सुमारास स्वत:च्या वाहनातून जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार आणि सांगलीतले एक पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले. तिथं पऱ्हाड यांची चारचाकी कार्य़ालयासमोर उभीच होती. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, छावण्या सुरू राहिल्याच पाहिजेत अशा घोषणा देत त्यांनी गाडीची तोडफोड केल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, जिल्हाध्यक्ष रणजित भोसले आणि अन्य दोघे स्वत:हून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, August 12, 2013, 20:10


comments powered by Disqus