मनसे जिल्हाध्यक्षाला जुगार अड्ड्यावर अटक, Mns kolhapur

मनसे जिल्हाध्यक्षाला जुगार अड्ड्यावर अटक

मनसे जिल्हाध्यक्षाला जुगार अड्ड्यावर अटक
www.24taas.com, कोल्हापूर

कोल्हापूरच्या मनसे जिल्हाध्यक्षाला जुगार अड्ड्यावर अटक करण्यात आली आहे. नवेज मुल्ला असं त्यांचं नाव आहे. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

पन्हाळा तालुक्यातल्या कोडोलीमध्ये जुगार अड्ड्यावर सीआयडीच्या अधिका-यांनी छापा टाकला. यामध्ये मनसे जिल्हाध्यक्ष नवेझ मुल्लासह 23 जणांना रंगेहाथ पकडून त्यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून 13 लाख 69 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर आता मनसेकडून जिल्हाध्यक्षांवर काय कारवाई करण्यात येणार आहे याकडे लक्ष लागून राहिले आहे.

First Published: Thursday, September 13, 2012, 12:06


comments powered by Disqus