Last Updated: Tuesday, December 11, 2012, 18:14
www.24taas.com, कोल्हापूरकोल्हापूरातील सामाजिक न्याय भवनच्या विभागीय जात पडताळणी कार्यालयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं टाळं लावून अधिका-यांना कोंडून ठेवलं.
जात पडताळणी कार्यालयामध्ये गलथान,भ्रष्ट कारभार सुरू आहे. अनेक वर्षांपासून जात पडताळणीचे दाखले वेळेत मिळत नसल्याचा आरोपही मनसे कार्यकर्त्यांकडून केला जातोय. दाखले वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्याचं नागरिकांनीही सांगितलं.
यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी विभागीय जात पडताळणी कार्यालयाला टाळं ठोकत याबबातचा निषेध नोंदवला.
First Published: Tuesday, December 11, 2012, 18:06