मनसेला दणका, काँग्रेसला विरोधी नेतेपद, mns losses, congress win

मनसेला दणका, काँग्रेसला विरोधी नेतेपद

मनसेला दणका, काँग्रेसला विरोधी नेतेपद

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुणे महापालिकेचं विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला मिळालंय. पुणे महापालि्केच्या 40 अ प्रभागातल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या लक्ष्मीताई घोडके विजयी झाल्यात. त्यांनी मनसेच्या इंदूमती फुलावरे यांचा 4 हजार 342 मतांनी पराभव केला.

जातीचं खोटं प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी मनसेच्या नगरसेविका कल्पना बहिरट यांचं नगरसेवकपद रद्द झाल्या मुळे ही पोटनिवडणूक झाली. काँग्रेस आणि मनसेचं पालिकेतलं संख्याबळ २८ असल्यानं ही निवडणूक महत्वाची होती. या पोटनिवडणुकीतला पराभव हा मनसेसाठी धक्का मानला जातोय.

दरम्यान भोसरी प्रभाग क्रमांक 34 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रद्धा लांडे विजयी झाल्यात. त्यांनी शिवसेनेच्या सारीका कोतवाल यांचा पराभव केलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 8, 2013, 15:21


comments powered by Disqus