Last Updated: Monday, May 13, 2013, 20:23
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरLBT च्या मुद्दावरुन व्यापारी आणि सरकार यांच्यातील तिढा अद्याप कायम असला तरी या मुद्दावरुन राजकीय पक्षच एकमेकांच्या समोरासमोर आल्याचं चित्र कोल्हापुरात पाहायला मिळालं.
कोल्हापुरात एलबीटी विरोधातील बंद मुळे दुकानं मोठ्या प्रमाणात बंद असल्याने सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बिग बझार मॉल लोकांसाठी सुरु ठेवण्यास सांगितलं. मात्र यामुळे एलबीटीला मुंबईसह इतर ठिकाणी विरोध करणा-या शिवसेनेने बिग बझारची तोडफोड करुन मॉल बंद पाडला. त्यामुळे एकीकडे हा मुद्दा चिघळणार असं दिसत असताना या मुद्दावरुन राजकीय पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसतायत.
अक्षय्य तृतियेला ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून व्यापा-यांनी आज दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. तर कोल्हापुरात मात्र दुकानं बंद राहिल्यानं ग्राहकांची निराशा झाली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, May 13, 2013, 20:23