Last Updated: Tuesday, April 30, 2013, 11:36
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरकोल्हापुरातलं टोलविरोधी आंदोलन पुन्हा पेटण्याची चिन्हं आहेत.. सोमवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांनी टोलला विरोध करत २ टोलनाक्यांना लक्ष्य केलं.. यावेळी 2 टोलनाक्यांवर तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली..
उसगावचा टोलनाक्यावर तोडफोड तर फुलेवाडीचा टोलनाका पेटवण्यात आला... कोल्हापुरातल्या टोलवसूलीला विरोध करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड आणि जाळपोळ केली... कोल्हापुरातल्या टोलनाक्य़ांविरोधात जनतेमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये संताप आहे.
यापूर्वीही अनेकदा टोलनाक्य़ांविरोधात अनेक आंदोलनं झाली. ११ फेब्रुवारीला शिवसैनिकांनी टोलनाक्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर काल रात्री पुन्हा मनसैनिकांनी टोल नाक्यांची तोडफोड केलीये. कोल्हापुरातल्या जनतेचा टोलनाक्यांविरोधातला संताप दिवसेंदिवस वाढत चाललाय.
First Published: Tuesday, April 30, 2013, 10:13