Last Updated: Thursday, June 12, 2014, 17:44
www.24taas.com, झी मीडिया, पुणेपुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणातील आरोपी धनंजय देसाई याच्यासह सर्व २१ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
हे सर्व आरोपी हिंदू राष्ट्र सेना या संघटनेशी संबंधित आहेत. त्यांना आज पुण्याच्या कँटोन्मेन्ट कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी त्याची पोलिस कोठडी ३ दिवसांनी वाढून मिळावी अशी विनंती सरकारी पक्षानं केली होती. मात्र न्यायालयांनी ती नामंजूर करत सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 12, 2014, 17:43