Last Updated: Tuesday, August 6, 2013, 15:58
www.24tass.com , झी मीडिया, पुणेपुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. सध्या पुण्यात मोबाईलशी माक़डचेष्टा सुरू आहेत. पुण्यात वानरं दिसली तर लगेच सावध व्हा. कारण मोबाईल चोरणा-या वानरांची टोळी पुण्यात सक्रिय झालीय.
मोबाईल पळवणा-या वानरांनी पुण्यात अक्षरशः उच्छाद मांडलाय...वानरांची ही टोळी नागरिकांना घाबरवते आणि मग जबरदस्तीनं त्यांचा फोन हिसकावून घेते.. पुण्यातल्या कोथरुड परिसरातल्या करिष्मा सोसायटीमध्ये हा प्रकार घडलाय. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन महिन्यांत वानरांनी तब्बल शंभर मोबाईल्स चोरलेत.
ही वानरं मोबाईल का पळवतात, हे अजूनही समजू शकलेलं नाही. वानरांच्या या हैदोसामुळे पुणेकर हैराण झालेत.मात्र या वानरांना कोणत्या गोष्टीचं आकर्षण आहे, याचं कुतूहल वाढलंय. दरम्यान या वानरांच्या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी क्रिएटिव्ह फाऊंडेशननं प्रशासनाकडे तक्रार केलीय. क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या संदीप खर्डेकर यांनी पत्र लिहून मनपा, पोलीस आणि वनखात्याने या वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केलीय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, August 6, 2013, 15:58