Last Updated: Wednesday, June 19, 2013, 17:17
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसतत होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आईनेच सुपारी देऊन मुलाचा खात्मा केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे.
अमर वसंत म्हाकवेकर (वय २७) असे मृत मुलाचे नाव असून त्याच्याच मित्राकडून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित अमर तानाजी लोखंडे या २२ वर्षीय मित्राला अटक केली. संशयित आई श्रीमती सुशीला वसंत म्हाकवेकर (५०) व रोशन कलंदर मुजावर (३५) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
अमर म्हाकवेकरचा टॉऊन हॉल पिकअप शेडमध्ये रविवारी (दि. १६) सकाळी मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपास नातेवाईक आणि मित्रांच्या भोवतीच केंद्रीत केला होता. खुनाच्या दिवशी लक्ष्मीपुरी पोलिसांनी गस्त घालताना मृत अमरसोबत तरुणाला पाहिले होते. त्या तरुणाचा शोध घेतला असता, त्याचाच मित्र अमर लोखंडे याचा सुगावा लागला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत संशयित अमर लोखंडेने खुनाचा घटनाक्रम सांगितला. तो म्हणाला, अमरला दारूचे व्यसन होते. तो घरात आईशी सतत भांडण काढून मारहाण करीत असे. त्यामुळे त्याच्या त्रासाला आई कंटाळली होती.
तिने हा प्रकार रोशन मुजावरला सांगितला. त्यानुसार मुजावर आणि अमरची आई १३ जूनला माझ्या घरी आल्या आणि सुपारी दिली. त्यानंतर मी शनिवारी (दि. १५) रात्री अमरच्या घरी गेलो. यावेळी त्याने माझ्याकडे लग्नाची पार्टी मागितली. आम्ही दोघे दारू पिऊन घरी येत असताना टाऊन हॉल बसस्टॉपजवळ त्याला बसवून मी त्याच्या घरी गेलो. यावेळी त्याच्या आईने आणइ भाभीने त्याला संपवून घरी ये, असे सांगितले. त्यामुळे मी पुन्हा बसस्टॉपवर आलो. माझ्या जवळील हातरुमालाने त्याचा गळा दाबून त्याचा खून केला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 19, 2013, 17:17