मुंबईतील कॉलेज विद्यार्थ्यांचा लोणावळ्यात धिंगाणा, Mumbai college students party in Lonavla

मुंबईतील कॉलेज विद्यार्थ्यांचा लोणावळ्यात धिंगाणा

मुंबईतील कॉलेज विद्यार्थ्यांचा लोणावळ्यात धिंगाणा
www.24taas.com, झी मिडिया, पुणे

पुणे जिल्ह्यातील लोणावऴयातील एका बंगल्याच्या आवारात मध्यरात्री दारु आणि हुक्का पिऊन अश्‍िलल नृत्य करणाऱ्या कॉलेज तरुण-तरुणींना लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हे तरुण-तरुणी मुंबईतील एका कॉलेजच्या फायनल इयरचे विद्यार्थी आहेत.

यात २० मुली आणि२६ मुलांचा समावेश आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार या बंगल्यावर छापा टाकला असता त्यांना तेथे काही मुले आणि चेह-यावर मास्क लाऊन केवळ अंतरवस्त्र परिधान केलेल्या काही मुली एकत्र अश्लिल चाळे करीत संगिताच्या तालावर धुंद होऊन नाचत असल्याचे आधळून आले.

सात दिवसांपूर्वीच लोणावळा पोलिसांनी शहरामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता. यांनतर काही दिवसांच्या अंतरातच हे प्रकरण उघडकीस आल्याने लोणावळा शहर हे केवळ नशा करून मौज मस्ती करण्‍यासाठी येथे येणा-यांचा अड्डातर बनला नाहीना, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Thursday, April 3, 2014, 10:36


comments powered by Disqus