मागील काही महिन्यापूर्वी राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीचा गोपीनाथ मुंडेंनी आपल्या शैलीत समाचार घेतला. अजित पवारांवर तोंडसुख घेताना " आमचं सगळ संपवायला

घरफोड्यांचं घर वर्षभरात फुटलं - मुंडे

घरफोड्यांचं घर वर्षभरात फुटलं - मुंडे
ww.24taas.com, अहमदनगर

भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवान बाबा गडावर येऊन भगवान बाबानचे दर्शन घेतले. सालाबाद प्रमाणे दसऱ्याच्या मुहूर्तावर गोपीनाथ मुंडे यांनी भगवान बाबा गडावर जाहीर सभा घेतली.

मागील काही महिन्यापूर्वी राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीचा त्यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. अजित पवारांवर तोंडसुख घेताना " आमचं सगळ संपवायला निघालेले ते १ वर्ष ही टिकले नाही. आमचं घर फोडलं तुमचंही टिकतं की नाही सांगता येत नाही " असा इशारा गोपीनाथ मुंडे यांनी दिला.

आता आपलं लक्ष दिल्लीत नसून मुंबई मध्ये असल्याचं ही ते सांगायला विसरले नाही. या वेळी हजारोंचा जनसमूह भगवान बाबा गडावर उसळला होता.

First Published: Thursday, October 25, 2012, 19:44


comments powered by Disqus