Last Updated: Tuesday, April 2, 2013, 00:09
www.24taas.com, मुंबईराज्य सरकारनं दुष्काळी भागात लवकरात लवकर चारा छावण्यांचे पैसे मिळावेत आणि लोकांना लगेचच मदत द्यावी, अशी मागणी गोपीनाथ मुंडेंनी केली आहे. अन्यथा 8 तारखेपासून उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय.
दुष्काळासाठी राज्य सरकारने काही नव्या घोषणा केल्या होत्या. अनामत रक्कम न भरताही चारा छावण्या सुरू करण्यात येतील, असं अश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अजूनही चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत.
यावद्दल नाराजी व्यक्त करताना ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दुष्काळग्रस्तांना लवकरात लवकर चारा छावणीचे पैसे मिळावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा ८ तारखेपासून उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
First Published: Tuesday, April 2, 2013, 00:09