Last Updated: Sunday, January 13, 2013, 00:13
www.24taas.com, शिर्डी नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला असलेल्या काटवनातून पोलिसांनी काल (शुक्रवार) रात्री ताब्यात घेतला. मनमाड येथे काल अटक करण्यात आलेला आरोपी सुनील सुरेश ऊर्फ पप्पू साळवे (वय 32) याने 28 डिसेंबर रोजी बलात्कार करून तिचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध बलात्कार, खून व पुरावा नष्ट करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या निर्घृण गुन्ह्याची शहरात आज संतप्त प्रतिक्रिया उमटली. ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा, पोलिस अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा नागरिकांनी निषेध केला. पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्या बदलीची मागणी करण्यात आली. भटके-विमुक्त जाती-जमाती संघाने नगर-कोपरगाव मार्गावर "रास्ता रोको` आंदोलन केले. त्यात कालिकानगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मृत मुलीचे कुटुंब याच भागात वास्तव्यास आहे.
आरोपीला कडक शिक्षा व्हावी; मानवतेला काळिमा फासणाऱ्या आरोपीचे वकीलपत्र कोणी घेऊ नये, अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.
First Published: Sunday, January 13, 2013, 00:12