Last Updated: Wednesday, November 13, 2013, 12:49
www.24taas.com, झी मीडिया, पुणेबाईकला कट मारल्याबद्दल पुण्यानजीक भोसरीतील चक्रपाणी वसाहतीमधील भूतबंगल्यात एका तरुणाचा डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी सकाळी सव्वाआठला घडला. भोसरी पोलिसांनी अवघ्या चार तासांत या प्रकरणाचा छडा लावत एकाला अटक केली. मृत तरुणाचं नाव उमाकांत सुरेश कांबळे असून तो २५ वर्षांचा होता. २० वर्षीय विकी दादाजी खैरनार याला हत्येसंदर्भात पोलिसांनी अटक केली आहे.
उमाकांतचा चुलतभाऊ शिवराज रमेश कांबळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भोसरीतील आळंदी रस्त्यावरून मध्यरात्नी साडेबाराच्या सुमारास उमाकांत मित्रासोबत बाईकवरून जात होते. तेथून विकीदेखील बाईकवरून जात असताना त्यांच्या बाईक्स एकमेकांना घासल्या. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाचीत उमाकांत आणि त्याच्या मित्राने विकीला दगड फेकून मारहाण केली. त्यात उमाकांतचा मित्र पसार झाला.
झालेल्या मारहाणीमुळे राग अनावर झालेल्या विकीने उमाकांतचा पाठलाग केला. त्यात चक्रपाणी वसाहतीमध्ये जाधव बंगला नावाच्या इमारतीमध्ये उमाकांतला बेदम मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घातला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांना खिशात सापडलेल्या पगाराच्या पावतीवरून त्याची ओळख पटली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, November 13, 2013, 12:49