Last Updated: Monday, September 10, 2012, 22:11
www.24taas.com, पुणे१६ वर्षांच्या शाळकरी मुलीची पुण्यात हत्या झालीय. पूजा जाधव असं या मुलीच नाव आहे. ही हत्या का आणि कशी झाली याचा खुलासा नं झाल्यानं ही घटना एक गूढ बनलीय.
पाषाण परिसरातल्या पूजाच्या घरापासून फक्त १०० मीटरवर पूजाचा मृतदेह आढळून आला. पाषाण पोलीस चौकीही इथून हाकेच्या अंतरावर आहे. दहावीत शिकणारी पूजा शनिवारपासून बेपत्ता होती. संध्याकाळी ती क्लासला गेली होती. मात्र क्लास संपल्यानंतर ती घरी परतलीच नाही. तिचा शोध सुरु झाला तेव्हा तिचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आदळून आला. तिच्या शरीरावर कंपास पेटीतल्या करकटानं वार केलेले होते.
जाधव कुटुंब दोनच महिन्यांपूर्वी पुण्यात आलं होतं. पूजाचे वडील ए. आर. डी. ए. मध्ये कामाला आहेत. त्याच परिसरात ते राहतात. पुजाची हत्येनं कुटुंबाला मोठा धक्का बसलाय.
पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टवरून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होत नाहीय. त्याच प्रमाणे तिची हत्या कोणी आणि कशासाठी केलीय त्याचा तपास सुरू आहे. अशा परिस्थितीत या हत्या प्रकरणाचा उलगडा करणं पोलिसांसाठी मोठं आव्हान बनलंय.
First Published: Monday, September 10, 2012, 22:10