नरेंद्र दाभोलकर हत्या : दोघांना अटक, आरोपी आज कोर्टात, Narendra Dabholkar murder: two arrested

नरेंद्र दाभोलकर हत्या : दोघांना अटक, आरोपी आज कोर्टात

नरेंद्र दाभोलकर हत्या : दोघांना अटक, आरोपी आज कोर्टात
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या संदर्भात मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांनाही पुण्याच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. दोघेही नागोरी गँगचे सदस्य आहेत.

मनीष नागोरीने पुरवलेल्या बंदुकीतून डॉ. दाभोलकरांची हत्या झाल्याचं बॅलेस्टिक रिपोर्टवरुन स्पष्ट झालंय. त्यामुळे या दोघांचा दाभोलकरांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरुन पुण्याच्या गुन्हे शाखेने ही अटक केली आहे. या दोघांनाही आज सुनावणीसाठी शिवाजीनगर कोर्टात सादर करण्यात येणार आहे.

दाभोलकरांच्या हत्येनंतर लगेचच म्हणजे २० ऑगस्टलाच मनीष आणि विकासला एटीएसने ठाण्यातून ताब्यात घेतलं होतं. दीड महिने त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली, मात्र कोणताही सुगावा लागला नाही. यानंतर मग पुणे पोलिसांनी मनीष आणि विकासला ताब्यात घेतलं. पुणे विद्यापीठातील रखवालदार हत्या आणि पिंपरी-चिंचवडमधील एका हत्येप्रकरणाचं कारण देत, पुणे पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला. मात्र दाभोलकर हत्येप्रकरणाच्याच चौकशीसाठी मनीष आणि विकासला ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

दाभोलकरांवर ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या, ते पिस्तुल मनीषकडून विकत घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आता उलगडा होण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

व्हिडिओ पाहा

First Published: Tuesday, January 21, 2014, 11:46


comments powered by Disqus