मोदींची लाट ही मीडियाची - शरद पवार, Narendra Modi, the wave of the media - Sharad Pawar

मोदींची लाट ही मीडियाची - शरद पवार

मोदींची लाट ही मीडियाची - शरद पवार
www.24taas.com, झी मीडिया, सातारा

सध्या चर्चेत असलेली नरेंद्र मोदींची लाट म्हणजे एका पक्षाची, व्यक्तीची आणि मीडियानं निर्माण केलेली लाट असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

यावेळी दलित अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आज शरद पवारांनी व्यक्त केलीय. या संदर्भात गृहमंत्र्यांनी प्रशासकीय अधिका-यांची बैठक बोलवावी, अशी मागणी पवारांनी आज केली. दरम्यान पवारांनी आज मोदींबाबतही वक्तव्य केलं. मोदींची लाट आहे असं वाटत नाही, १९७७ नंतर मी कोणतीही लाट पाहीलेली नाही असं पवार म्हणाले.

कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेत शरद पवारांची माजी सदस्य प्रा. यू. जी.पाटील यांनी केलेल्या आरोपांवर पवारांनी बोलणं टाळलंय. रयतमध्ये एकाधिकारशाही सुरु असल्याचा हल्लाबोल मॅनेजिंग कौन्सिलचे माजी सदस्य प्रा. यू.जी.पाटील यांनी केला होता. पवारांनी रयत शिक्षण संस्थेच्या आज होणा-या निवडणुकीत रस दाखवू नये, अशी अपेक्षा प्रा. यू. जी.पाटील यांनी व्यक्त केली होती.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 9, 2014, 18:53


comments powered by Disqus