Last Updated: Saturday, March 30, 2013, 23:15
www.24taas.com, पुणेनक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्या माओवाद्यांचा गट पुण्यामध्ये सक्रीय असल्याची माहिती समोर आलीय. माओवाद्यांनी आपलं अस्तित्व दाखवणारी पत्रकं शहरांतल्या वेगवेगळ्या भागात चिकटवली आहेत.
तुरुंगात असलेल्या माओवाद्यांच्या अधिकारांच्या समर्थनार्थ मागणी सप्ताह पाळण्याचे आवाहन या पत्रकांद्वारे करण्यात आलंय. माओवाद्यांच्या पत्रकबाजीचे प्रकार यापुर्वीही पुण्यात घडले होते.
या प्रकरणी पुण्यातून काही नक्षलवाद्यांनाही अटक केली होती. त्यामुळे सांस्कृतीक राजधानी म्हणून गौरवण्यात येणारं पुणे शहर माओवाद्यांचा अड्डा बनलंय का हा प्रश्न उपस्थित झालाय.
First Published: Saturday, March 30, 2013, 23:15