Last Updated: Sunday, December 23, 2012, 17:25
www.24taas.com, कोल्हापूरराजकीय पक्षांमधील वैमनस्य हे कौटुंबिक पातळीवरही पोहोचू लागल्याचं कोल्हापूरमधील एका घटनेमध्ये दिसून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांचा मुलगा युद्धवीर गायकवाड याने ज्येष्ठ भाजप नेते रामभाऊ चव्हाण यांचा नातू प्रसाद याच्या गाडीवर गोळी झाडली.
युद्धवीर गायकवाड हा माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचा नातू आहे. युद्धवीर आणि प्रसाद हे दोघे विवेकानंद कॉलेजमध्ये शिकत आहेत. कॉलेजमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्यावरून दोघांमध्ये यापूर्वीही अनेक वेळा वाद झाले आहेत.
मात्र शुक्रवारी सकाळी युद्धवीर याने प्रसादच्या गाडीवर गोळीबार केला. या वेळी त्याने तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये जरी कुणी जखमी झालं नसलं, तरी युद्धवीरकडे पिस्तुल आली कुठून, असा प्रश्न पडला आहे.
First Published: Sunday, December 23, 2012, 17:25