Last Updated: Monday, December 31, 2012, 17:49
www.24taas.com, पुणेपुण्यात थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी जागोजागी फलक लागले होते. वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ३१ डिसेंबरच्या मद्य पार्ट्यांच्या निमंत्रणासाठी लावलेले फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फाडून जाळून टाकले.
दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडित तरुणीच्या निधनानं देश शोकसागरात बुडाला आहे. त्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे मद्यधुंद सेलेब्रेशन करू नये. असं आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं केलंय. पुण्यात ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांचे फलक मोठ्या प्रमाणावर लागले आहेत.
चौका-चौकात लागलेल्या या फलकांवरून मद्य पार्ट्यांचे जाहीर निमंत्रण देण्यात येतंय. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अशा मद्य पार्ट्यांचे फलक काढून जाळले.
First Published: Monday, December 31, 2012, 17:49