बिल्डर आणि पुणे महापालिका प्रशासनाचं साटंलोटं! nexus between Builders & PMC

बिल्डर आणि पुणे महापालिकेचं साटंलोटं!

बिल्डर आणि पुणे महापालिकेचं साटंलोटं!


पुणे महापालिकेच्या अजब कारभाराचा धक्कादायक नमुना समोर आलाय. अपूर्ण बांधकामाला पूर्णत्वाचा दाखला देण्याचा प्रताप महापालिका प्रशासनाने केलाय. या प्रकारामुळे इथले रहिवासी प्रचंड त्रस्त आहेत. मात्र त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे, बिल्डर आणि महापलिका प्रशासन यांच्यातील साटलोटं यानिमित्ताने उघडकीस आल आहे.

पुण्यातल्या बाणेर पाषाण रोडवरील अलिशान मिडोज हॅबिटेट सोसायटी पुणे महापालिकेच्या लेखी मुलभूत सोईसुविधांनी युक्त आहे. २३ मार्च २०१२ ला पूर्णत्वाचा दाखला दिला असला तरी इमारतीत अद्यापही पिण्याचं पाणी, वीज कनेक्शन, ड्रेनेज व्यवस्था नाही. महापालिकेनं बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिल्यानं बिल्डरनं रहिवाशांच्या ताब्यात सदनिका देऊन पोबारा केलाय़. जेव्हा रहिवासी इमारतीत राहण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेनं इमारतीचं बांधकाम अपूर्ण असल्याची नोटीस 5 ऑक्टोबरला बजावलीये. या प्रकरणातून चिरीमिरीसाठी अधिकारी बिल्डरांचे बटीक बनल्याचं समोर आलंय.

वास्तविक पाहता पालिकेचे अधिकारी इमारतींच्या तपासणीनंतरच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देतात. मात्र मिडोज हॅबिटेट सोसायटीची पाहणीच केली नसल्याचं स्पष्ट झालयं. आता कारवाई करण्याचं सोंग महापालिकेनं घेतलं असलं तरी या निमित्तानं बांधकाम विभागातला अनागोंदी कारभार चव्हाट्य़ावर आलाय़.

First Published: Monday, October 22, 2012, 16:00


comments powered by Disqus