Last Updated: Monday, November 25, 2013, 15:46
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीपुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले आहेत. अनुसुचित जाती प्रवर्गातल्या एका व्यक्तीशी संबंधित प्रकरणात आयोगाच्या आदेशांचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
यामुळे आयोगाने मुख्य सचिवांना पोळ यांना अटक करून आयोगापुढे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगापुढे विहीत काळात सादर होण्यास आयुक्त तयार असतील तर त्यांना ५०० रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यास आयोगाने परवागनी दिलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, November 25, 2013, 15:46