पुण्यात पुनःपुन्हा पार्टी, पण कारवाई केव्हा? no arrest in Pune party yet

पुण्यात पुनःपुन्हा पार्टी, पण कारवाई केव्हा?

पुण्यात पुनःपुन्हा पार्टी, पण कारवाई केव्हा?

www.24taas.com, पुणे

पुण्यात मुंढवा परिसरात रिव्हर व्ह्यू रिसॉर्टमध्ये शनिवारनंतर रविवारीही अल्पवयीन मुलांनी दारुच्या नशेत धिंगाणा घातल्याचं समोर आलंय. मात्र अजूनही जागा मालकांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

पुण्यात अल्पवयीन मुलांनी शनिवारी आणि रविवारी दारु पिऊन असा धिंगाणा घातला. पुण्यातल्या मुंढवा परिसरातल्या हॉटेल रिव्हर व्ह्यू मध्ये हा धिंगाणा सुरू होता. शनिवारी आठवी आणि नववीतल्या सुमारे सातशे मुलांनी हा धिंगाणा घातला. ही मुलं दारुच्या नशेत एवढी अधीन होती की त्यांना कशाचीच शुद्ध नव्हती. स्वत:च्या पालकांनाही ही मुलं जुमानत नव्हती. अखेर हतबल पालकांना पोलिसांना पाचारण करावं लागलं.

रविवारी पुन्हा त्याच ठिकाणी आणि तशाच पद्धतीची पार्टी झाली. अल्पवयीन मुलंमुली पुन्हा झिंगली. इतकं झाल्यानंतरही पार्टीच्या आयोजकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल न करता किरकोळ गुन्ह्यांची नोंद केली गेली. आणि केवळ 1200 रूपये दंड आकारून त्यांना सोडून देण्यात आलं आणि महत्वाचं म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या पार्टीची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. किंबहुना ज्या ठिकाणी ही पार्टी झाली त्या ‘व्ह्यू रिसॉर्ट हॉटेल’च्या मालकांनी पोलिसांना त्याबद्दल कळवण्याची तसदी देखील घेतली नाही.

‘रिव्हर व्ह्यू रिसॉर्ट’ अजित पवारांचे चुलत बंधू जयंत पवार यांच्या मालकीचं आहे. मात्र अजूनही जागा मालकांवर कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय...

First Published: Thursday, August 30, 2012, 10:58


comments powered by Disqus