Last Updated: Sunday, September 29, 2013, 22:45
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवडपिंपरी चिंचवड जवळ चाकण इथल्या 13 वर्षीय राकेश चौधरी या मुलाच्या - राकेशच्या डोळ्यातून चक्क वस्तू निघत आहेत. कधी खडे, कधी टिकल्या तर कधी स्क्रू…विश्वास बसणार पण हे खरं आहे.
तेरा वर्षाच्या मुलाच्या डोळ्यातून चक्क खडे काही वेळा टिकल्या तर काही वेळा स्र्कू निघतांना दिसून येतात. तुम्ही पाहता ते खर आहे..हा चमत्कार आहे का? असेलही..पण चाकण मध्ये राहणारा हा 13 वर्षीय राकेश चौधरी गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या या विचित्र कारनाम्यामुळं खूपच चर्चेत आलाय..राकेशच्या डोळ्यातून या वस्तू कशा काय निघतात याचं त्याला काही कारण माहित नाही.
राकेशचे वडिल आपल्या मुलाच्या या चमत्कारिरक वागण्यामुळे चिंतेत आहे..खरं तर त्यांनाही त्यांच्या मुलाच्या डोळ्यांना काय झालय याचं काहीच माहीत नाही..पण त्याचा लवकरात लवकर इलाज व्हावा अशी इच्छा आहे.
सध्या राकेश चौधऱीला पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आलंय. राकेशच्या डोळ्यातून वस्तू का निघातायेत हे इथल्या तपासणी नंतरच स्पष्ट होणारेय...पण सध्या तरी या मुलाची चर्चा मात्र जोरदार सुरु आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, September 29, 2013, 22:35