Last Updated: Thursday, September 13, 2012, 22:16
www.24taas.com, पुणेपुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी किरण बापू महाजन यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता सापडली आहे. 24 लाख 24 हजारांची रोख रक्कम, 1 कोटी 79 लाख रुपये किंमतीचं सोने, स्थावर मालमत्ता आणि इतर मालमत्ता सापडली आहे.
महाजन यांना दोन लाखांची लाच घेताना बुधवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक शाखेनं रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर महाजन यांच्या बाणेर इथल्या फ्लॅटची लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं झडती घेतली. त्यात ही मालमत्ता आढळून आली.
दरम्यान महाजन यांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं. कोर्टानं त्यांची जामिनावर सुटका केलीए. मुळशी तालुक्यातील खांड गावातील 10 एकर जमिनीची गावडे यांना नवीन शर्तीप्रमाणे जागेच्या व्यवहारासाठी परवानगीची आवश्यकता होती. त्यासाठी उपजिल्हाधिकारी महाजन यांनी गावडे यांच्याकडे 2 लाख रूपयांची लाच मागितली होती. त्यांच्याविरोधात संजीव गावडेंनी तक्रार दिली होती. महाजन यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तीन महिन्यांपासून लक्ष ठेवून होते.
First Published: Thursday, September 13, 2012, 22:10