सुनेच्या जाचाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या old couple suicide in sangli

सुनेच्या जाचाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

सुनेच्या जाचाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या
www.24taas.com, झी मीडिय़ा, सांगली


सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बासुंबे गावात, मुलाच्या आणि सुनेच्या जाचाला कंटाळून वृद्ध दांपत्याने आत्महत्या केली.

शंकर भगवान पाटील (वय 65) आणि लक्ष्मीबाई शंकर पाटील (55, रा. बासुंबे) या या दांपत्याने, सकाळी 11 वाजण्याच्या पूर्वी हा प्रकार घडला.

मृत शंकर पाटील यांच्या सिद्धेश्वर मळा परिसरातील जुन्या घरात त्यांनी तुळईस दोरीने गळफास लावून घेतला. घराला आतून कडय़ा लावून घेतल्या होत्या. पोलिसांनी घराची कौले काढून आत प्रवेश केल्यानंतर हा प्रकार स्पष्ट झाला.

या दांपत्याने आपल्या जीवनाचा अखेर करत असताना दोन चिठ्ठय़ा लिहून ठेवल्या. त्या चिठ्ठय़ांमध्येच मुलाच्या आणि सुनेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. या दोन्ही चिठ्ठय़ा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

दिवसभर या प्रकाराची चर्चा वासुंबे परिसरात होती. पाटील यांच्या घराजवळ शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मृत शंकर पाटील यांचा मुलगा नंदकिशोर शंकर पाटील आणि सून तनुजा नंदकिशोर पाटील यांचा सुमारे 8 ते 9 महिन्यांपूर्वी विवाह झालेला आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला
color="blue">फेसबुक
वर जॉइंन करा.




झी २४ तासला ट्विटरवर फोलो

करा.

First Published: Sunday, March 16, 2014, 23:17


comments powered by Disqus