अडीच लाख रुपयांचं एक लिंबू! one lemon worth rs. 2.5 lacs

अडीच लाख रुपयांचं एक लिंबू!

अडीच लाख रुपयांचं एक लिंबू!
www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

एका लिंबाची किंमत अडीच लाख रुपये आहे, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर.. नक्कीच तुम्हाला धक्का बसेल.. पण हे खरं आहे.. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं श्रद्धेच्या नावाखाली लागलेल्या बोलीत एक लिंबू अडीच लाखांना घेतलं जातंय. एवढचं नाही तर देवाचा विडा 21 लाख 11 हजार रुपयांना घेतला जातोय. ऐन दुष्काळातही हा सर्व प्रकार सुरु आहे.. .

एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती असताना, दुसरीकडे मात्र श्रद्धेपोटी लाक्षावधी रुपयांची उधळण याच राज्यात करण्यात येतेय... पिंपरी चिंचवड जवळच्या मोशी गावातलं हे वास्तव आहे.. यात्रेतील देवाचा विडा, ओटी आणि लिंबू उचलण्यासाठी इथं लक्षावधींची बोली लावली जाते.. नागेश्वर या ग्रामदैवतेच्या यात्रेत दरवर्षी प्रथेच्या नावाखाली ही अंधश्रद्धा सुरु आहे.

देवाच्या विड्याचा, ओटीचा आणि लिंबाचा लिलाव होतोय आणि तोही लक्षावधी रुपयांना. लिलावाचे पैसे ऐकले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.. देवाच्या ओटीची बोली 21 लाख रुपये… देवाच्या विड्याची बोली 21 लाख 11 हजार रुपये… देवाच्या लिंबाची बोली अडीच लाख रुपये… देवाच्या या वस्तू आपल्याकडे आल्यास ऐश्वर्य, सुख शांती मिळेल, या आशेतून ही बोली लावण्यात येतेय.


कित्येक दशकं सुरु असलेली ही परंपरा आजही मोशी मध्ये सुरु आहे. याला कोणी अंधश्रद्धा ही म्हणू शकतं, पण इथल्या श्रधाळूंची हीच भक्ती आहे.. राज्यात एवढा गंभीर दुष्काळ असतानाही, अशा वस्तूंसाठी आशेच्या नावाखाली लक्षावधी रुपयांची ही धळण योग्य आहे का, हाच मुळातला प्रश्न आहे...

First Published: Tuesday, March 12, 2013, 23:14


comments powered by Disqus