Last Updated: Tuesday, January 1, 2013, 23:10
www.24taas.com, सांगलीसांगलीत पाणी पुरीवाल्याने किळसवाणा प्रकार केल्याची धक्कादायक घटना पुढं आलीय. पाणीपुरीच्या पाण्यात चक्क मुत्र विसर्जन करतानाच नागरिकांनी पाणीपुरी विकणा-याला पकडलंय.
बिजेंद्र ठाकुर असं या पाणीपुरीवाल्याचं नाव आहे. तो हा किळसवाणा प्रकार करत असताना त्याला काही महिलांनी पाहिलं आणि त्याला डांबून ठेवलं. आपल्याकडून चूक झाली सोडून द्या सांगत ठाकूर विनवण्या करू लागला.
मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-या ठाकूरला महिलांनी चांगलाच चोप दिला.
First Published: Tuesday, January 1, 2013, 23:10