Last Updated: Tuesday, May 14, 2013, 13:51
www.24taas.com, झी मीडिया, सांगलीसांगली जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत गोंधळ झाला आहे. पालकमंत्री पतंगराव कदम आणि आमदार संभाजी पवार यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी कदम आणि पवार यांच्यात जोरदार तू-तू-मै-मैं झाली. पंतगराव कदम आणि संभाजी पवार यांच्यात चांगलीच जुंपली.
पालकमंत्र्यांनी संभाजी पवार यांना बाहेर काढण्याचा इशारा दिला.. त्यामुळं बैठकीतलं वातावरण चांगलंच तापलं... त्यामुळं या वादावादी आणि गोंधळाच्या वातावरणात पवार यांनी ही बैठक सोडली... या बैठकीच्या निमित्ताने सांगली जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीचा आखाडा झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं...
पालकमंत्री पतंगराव कदम यांनी संभाजी पवार यांना बाहेर काढण्याचा इशारा दिल्याने आमदार संभाजी पवार चांगलेच खवळले. आणि त्यामुळे त्यांच्यातील वाद टोकास गेला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 14, 2013, 13:46