Last Updated: Saturday, October 20, 2012, 16:19
www.24taas.com, पुणेराष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यस्तरीय अधिवेशन आज पुण्यात सुरू आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, दिलीप वळसे-पाटील, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात पिचड यांनी आपल्या पक्षाचं समर्थन करताना काँग्रेसला आव्हान दिलं आहे.
राष्ट्रवादीनं मिशन 2014ची तयारी सुरू केलीय. राष्ट्रवादी हाच राज्यातील एक नंबरचा पक्ष असून पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीला जास्त जागा हव्या असल्याचं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केलय.
केंद्रातील यूपीए सरकार हे शरद पवारांमुळेच असून काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर राष्ट्रवादी मागे जाणार नाही असंही पिचड यांनी म्हंटलय.
First Published: Saturday, October 20, 2012, 12:47