Last Updated: Thursday, August 1, 2013, 18:55
www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगरअहमदनगरच्या भिंगार इथे राज्यातले तृतीयपंथी लक्ष्मी आईची यात्रा करतात. रोगराईपासून संरक्षण तसंच सुखसमाधानासाठी ही यात्रा काढण्यात येते. चांदबिबीच्या काळापासून ही प्रथा आहे.
आषाढ महिन्यात अनेक ठिकाणी लक्ष्मीमातेची पूजा केली जाते. सुखसमाधानासाठी प्रार्थना केली जाते. अहमदनगर जिल्हायातल्या भिंगार इथे तृतियपंथी समाजातर्फे लक्ष्मीआईची यात्रा काढली जाते. लक्ष्मी आई, काळूबाई आणि महासरस्वती देवींचा यात्रोत्सव काढला जातो. यावेळी म्हसोबाचीही पुजा करतात. राज्यातल्या सर्वच भागातून तृतीयपंथी भाविक इथे येतात
रोगराईपासून राज्याचं रक्षण व्हावं तसंच सुखसमाधानाची प्रार्थना यावेळी करण्यात आली. उर्वरीत समाज तृतीयपंथियांना मानाने वागवत नाहीत. तरीही समाजासाठी प्रार्थना करून तृतीयपंथी मनाचा मोठेपणाच दाखवून देत आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 1, 2013, 18:55